Breaking : सामंत बंधूंच्या प्रयत्नाना मोठे यश; रत्नागिरी साठी केंद्रीय विद्यालय मंजूर

रत्नागिरी : रत्नागिरीच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारी मोठी बातमी आली आहे. रत्नागिरीसाठी नाचणे येथे केंद्रीय विद्यालयाला केंद्र सरकार कडून मान्यता देण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. मागील काही वर्षांपासून रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि राजापूर चे आमदार किरण सामंत हे रत्नागिरीत केंद्रीय विद्यालय आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. आज अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात देशात 85 नवीन केंद्रीय आणि 28 नवीन नवोदय विद्यालये उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. या केंद्रीय विद्यालयांमुळे शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला जाणार आहे. शिवाय एका केंद्रीय विद्यालयामुळे ६३ व्यक्तींना रोजगार देखील मिळणार आहे.