रत्नागिरी : महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी कार्यालयाबाहेर जिल्हाधिकारी ‘मविआ’च्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन करत लक्ष वेधून घेतले. यावेळी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमधील घोटाळ्यातूनच महायुतीचा विजय साकार झाल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करून ‘मविआ’च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करीत, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बारक्या बने, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, काँग्रेसचे अशोक जाधव, शिवसेना उबाठाचे संजय पुनस्कर, साजीद पावसकर, काँग्रेसचे दीपक राऊत यांच्यासह युयुत्स आर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका विरोधकांनी जिंकल्या आहेत. मतदारांना जे सरकार यावेसे वाटत होते. त्याऐवजी दुसऱ्यांनाच अधिक मतदान केंद्रात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत, अशी मागणी होत आहे. अमेरिकेतही बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात. मात्र भारतात अजूनही ईव्हीएमला प्राधान्य का दिले जात आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. भविष्यात सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. महायुतीचा विजय व शपथ विधी हा ईव्हीएमच्या महा घोटाळ्यातून झाला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 07/Dec/2024