खेडमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

खेड : भारतीय घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शहरातील जिजामाता उद्यानातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील विविध गावातील नागरिक अभिवादन करण्यासाठी आल्याने जणू जनसागरच लोटला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्व संध्येला खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष मंदार हळदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ते जिजामाता उद्यान अशी कैंडल मार्च पद यात्रा काढून महामानवाला अभिवादन करण्यात आले. ६ रोजी सकाळी विविध संघटना, पक्षच्या वतीने अभिवादन करण्यात आले दिवसभर अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतच होते यावेळी विविध पक्ष व संघटनांनी अनुयायींसाठी पाणी, चहा, बिस्कीट वाटप यांचे स्टॉल लावले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 07/Dec/2024