कणकवलीत आढळलेल्या मानसिक रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : एक महिन्यापूर्वी कणकवली येथे आढळून आलेल्या मानसिक आजारी तरुणाचा उपचारादरम्यान शुकवार, ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

दुर्जन रिदास (३०, पूर्ण नाव पत्ता समजू शकलेला नाही) हा तरुण ७ नोव्हेंबर २०२४ रोजी कणकवली येथे मानसिक आजाराने त्रस्त स्थितीत आढळून आला होता. त्याला उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान ६ डिसेंबर रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 07-12-2024