रत्नागिरी : शिवसेना ( उबाठा) गटात राजीनामास्त्र; प्रतिक झिमण यांचा राजीनामा

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना ( उबाठा) गटात राजीनामास्त्र सुरू झाले आहे. प्रसाद सावंत यांच्या पाठोपाठ आता डॉ. प्रतिक झिमण यांनी देखील पक्षाच्या सदयत्व पदाचा राजीनामा दिला आहे. तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.

विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार बाळ माने यांचा उदय सामंत यांनी दारुण पराभव केला. या निकालानंतर उबाठा गटात दुफळी निर्माण झाली. नुकत्याच झालेल्या बैठकीत याचे पडसाद देखील उमटले. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वप्रथम प्रसाद सावंत यांनी युवा तालुका संघटक पदाचा राजीनामा दिला. आता डॉ. प्रतिक झिमण यांनी आपल्या पक्ष सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. आपण मागील वीस वर्षे पक्षात कार्यरत असून वयक्तिक अडचणीमुळे राजकीय क्षेत्रात थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिक झिमण यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 07-12-2024