रत्नागिरी : शहरी रमाई आवास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बांधवांना पक्के आणि सुरक्षित घर बांधण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. शहरी रमाई आवास योजनेंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान आहे. त्यामुळे या समाज घटकांतील व्यक्तींनी पक्के घर बांधण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे. रत्नागिरी शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील बहुसंख्य समाज बांधवांना सुरक्षित निवारा नाही. अशा समाज बांधवांना पक्के घर बांधून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. रमाई आवास योजनेंतर्गत या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, मालकी हक्काची कागदत्रं, सहहिस्सेदारांची समंतीपत्रासह नोंदणीकृत अभियंत्यामार्फत बांधकाम परवानगी आवश्यक असल्याचे मुख्याधिकारी बाबर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 07/Dec/2024