देवरुख : देवरुख नगर पंचायतीला दलीत इतर या हेडखाली केल्या जाणाऱ्या विकास कामांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालया कडून प्राप्त न झाल्याने कामे रखडली आहेत. यासाठी अजित गवाणकर यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झालेल्या कामांचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. सन २०२३-२४ साठी हा निधी मंजूर झालेला आहे. देवरुख नगरपंचायतीने दोनवेळा मागणी करूनही नियोजन अधिकारी यांनी याची पूर्तता केली नाही. याची तक्रार आपण कोकण आयुक्तांकडे करणार आहोत. या आठवड्यात हा निधी प्राप्त झाला नाही तर आपण २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीला उपोषण करणार असल्याचे माजी सभापती अजित ऊर्फ छोट्या गवाणकर यांनी जाहीर केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 27/Sep/2024