आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६

मेष

आपल्या राशी पासून चंद्र लाभ भावात असणार आहे. आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात व मित्रांसह घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलघार्‍यांकडून लाभ होईल व त्यांचे सहकार्य मिळेल.

वृषभ

आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख – समाधान लाभेल.

मिथुन

आपल्या राशी पासून चंद्र भाग्य भावात असणार आहे. मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था व कटकटीचा राहील. शरीराने थकाल व आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल.

कर्क

आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. तसेच व्यापारात भागीदारां बरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. सरकारी कामात विघ्ने येतील.

सिंह

आपल्या राशी पासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदार व व्यापारी ह्यांच्याशी शांतपणे व्यवहार करावा.

कन्या

आपल्या राशी पासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आज नोकरी – व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्‍यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखावह असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल.

तूळ

आपल्या राशी पासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आपली वैचारिक व मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा – वादविवाद ह्यात सुद्धा आपला प्रभाव राहील.

वृश्चिक

आपल्या राशी पासून चंद्र चवथ्या भावात असणार आहे. आज मित्रांशी सावधपणे वागावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. धन व किर्तीची हानी होईल.

धनु

आपल्या राशी पासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आज आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आजचा दिवस नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल आहे.

मकर

आपल्या राशी पासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडल्याने मन दुःखी होईल. विनाकारण खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ

12 मे, 2026 मंगळवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस आपणास आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह आनंदात दिवस घालवाल.

मीन

स्थावर संपत्ती व कोर्ट – कचेरी ह्यांच्या पासून आज शक्यतो दूर राहा. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. स्वकीयांचा वियोग घडू शकतो.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 12-05-2026