जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रयोगशाळेला ‘कै. डॉ. नानासाहेब मयेकर प्रयोगशाळा’ असे नाव देऊन या नामफलकाचे उद्घाटन मयेकर कुटुंबातील पाच महिलांच्या हस्ते करण्यात आले. हा नामकरण समारंभ डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला. या उद्घाटन समारंभाप्रसंगी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुनील उर्फ बंधू मयेकर, सचिव विनायक राऊत, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, कोषाध्यक्ष संदीप कदम, शिक्षण संस्थेचे संचालक गजानन उर्फ आबा पाटील, संचालक व विद्यालयाचे सीईओ. किशोर पाटील, संचालक रोहित मयेकर, दिप्ती मयेकर, यशश्री पवार, नेहा मयेकर, बाबा मयेकर, बापू मयेकर, नंदकुमार यादव, शुभदा मयेकर, मुक्ता मयेकर, संस्थेचे हितचिंतक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 07/Dec/2024