५२ व्या रत्नागिरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ९ ते ११ डिसेंबरदरम्यान आयोजन

रत्नागिरी : पंचायत समितीचा शिक्षण विभाग आणि मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे रत्नागिरी तालुका विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ दिनांक ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज रत्नागिरी या ठिकाणी होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, ऋषीकेश शिक्षण प्रसारक मंडळ पनवेल, नवी मुंबई चे अध्यक्ष धनराज डी. विसपुते तसेच मातोश्री कमलबाई विसपुते प्रशाला रत्नागिरी च्या संचालिका नंदा प. शेलार, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार , रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. पी. जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तीन दिवस होणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजता नाव नोंदणी व प्रकल्प मांडणी केली जाईल. दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते १०.३० यावेळेत विज्ञान दिंडी, सकाळी १०.३० ते ११ वाजता मुख्य उद्घाटन समारंभ, दुपारी २ ते सायंकाळी ५.३० यावेळेत प्रश्नमंजुषा व मूल्यमापन होईल. दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते १०.३० यावेळेत साहित्य मूल्यमापन, सकाळी १०.३० ते ११.०० प्रदर्शन पाहण्यासाठी खुले, दुपारी २ ते सायंकाळी ५.३० बक्षीस वितरण समारंभ अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी आहे.

या विज्ञान प्रदर्शनाला सर्व विज्ञान प्रेमींनी उपस्थित राहून वैज्ञानिक प्रतिकृतींची पाहणी करावी आणि वैज्ञानिक विचार मंथनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी श्रीमती प्रेरणा शिंदे, मातोश्री कमलबाई विसपुते प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती विभावरी जोईल, शिक्षण विस्तार अधिकारी पोमेंडी बीट परिवार सुधाकर मुरकुटे व रत्नागिरी तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष विजयानंद निवेंडकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 07/Dec/2024