खेड : खेड तालुक्यात लोटे औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखाने दुषित सांडपाणी खाडीमध्ये सोडत आहेत त्यामुळे येथील सीईटीपी व अधिकाऱ्यांविरुद्ध जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत खाडीमधील प्रदूषण बंद होणार नाही. म्हणून दोषीविरूद्ध कारवाई व्हावी अशी विनंती प्रदूषण विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयातील याचिकाकर्ता हनिफ शरीफ परकार यांनी ५ डिसेंबर २०४ रोजी चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाला निवेदन सादर केले आहे.
या निवेदनाची प्रत त्यांनी कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनाही पाठविली आहे.
श्री. परकार म्हणतात की, लोटे सीईटीपीचा विस्तार झाला तरी सुध्दा जगबुडी, वाशिष्ठी, दाभोळ खाडीमधील प्रदूषण बंद झालेले नाही. सीईटीपीतून प्रक्रिया निर्दोष झाली असती तर खाडी परिसरातील पाण्याचा रंग बदलण्याची व मासेमर्तुकी सारखी समस्या निर्माण झाली नसती. असे मत त्यांनी मांडून लोटे सीईटीपी व तेथील अधिका-यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 07/Dec/2024