आबलोली : गुहागर तालुक्यातील शेवटचे टोक म्हणजे पडवे गाव अनेक सुविधा पासून वंचित असलेले गाव म्हणूनच ते परिचित होते. मात्र मागील काही वर्षात विविध विकास कामे निर्मल ग्राम पंचायती मार्फत करण्यात आली आणि हळूहळू गावाचा चेहरा मोहरा बदलू लागला, या बदलाचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर इथल्या गावचे तरुण तडफदार सरपंच श्री. मुजीब हुसैन जांभारकर याना देण्यात यावे. सरपंच श्री. मुजीब जांभारकर यांनी निर्मल ग्रामपंचायत पडवे गावाच्या माद्यमातून विविध विकासकामांना निधी आणणे त्यासाठी चिकाटी ने पाठ पुरावे करणे, सर्वांना विश्वासात घेऊन ती विकास कामे पूर्णत्वास नेणे यात ते चांगलेच निपुण असून पडवे गावात बंदर टोक रस्ता, पाणी योजना, गावात सिमेंट चे रस्ते, गरीब अपंग होतकरू महिला याना शासनाच्या विविध योजना चे माध्यमातून मदत असो की अडचण योग्य ती मदत सरपंच मुजीब जांभारकर करतात.
आजच्या स्थितीत पडवे येथील ग्रामपंचायतीची इमारत हि गेली ४० वर्ष जुनी इमारत होती ती कधीही पडली असती परंतु आपल्या पडवे गावातील ४५०० हजार लोकवस्ती असलेल्या गावाला एक चांगली इमारत व्हावी हे इथल्या अनेक ग्रामस्थांनच स्वप्न होत, पण हेही काम घेउन मागील २ वर्ष पासून निधी साठी शासन दरबारी सरपंच जात होते आणि त्यांच्या प्रयत्नांना आता अखेर यश आले आहे. सुमारे २५ लाखाचा निधी निर्मल ग्रामपंचायत पडवे ला जिल्हा नियोजन मधून मंजूर झाला आहे आणि कामाला ही सुरवात झाली आहे त्यामुळे सरपंच मुजीब जांभारकर यांच्या प्रयत्नातून गुहागर तालुक्यातील पडवे वासीयांना मिळणार सुसज्ज नवीन इमारत आणि गावातील इतरही विकास कामे सुरू होणार आहेत गावातील विकास कामांसाठी ग्रामस्थ, जमीन मालक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच पडवे गावचे पाणी पुरवठा कमीटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, तंटामुक्ती कमीटीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मौलिक सहकार्य लाभते अशी माहिती पडवे गावचे सरपंच मुजीब जांभारकर यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना दिली. विकास कामांबाबत पडवे पंचक्रोशीतून सरपंच मुजीब जांभारकर यांचे कौतुक करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 07/Dec/2024