रत्नागिरी : भाट्ये येथे भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : भाट्ये येथे धुरीच्या आगीचे किटाळ उडून साडीने पेट घेतल्यामुळे भाजलेल्या महिलेचा शनिवारी सकाळी ६ वा. सुमारास उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. पार्वती ओमप्रकाश भाटकर (रा. महाजनवाडी भाट्ये, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत तिचा मुलगा वैभव भाटकर याने खबर दिली आहे. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. सुमारास त्याची आई पार्वती भाटकर ही भाट्ये येथील आपल्या पान टपरीमध्ये असताना तिने मच्छर मारण्यासाठी एका पातेल्यामध्ये नारळाची सोडणे टाकून धुरी पेटवली होती. ती बाजुलाच खुर्ची टाकून बसलेली असताना वाऱ्यामुळे धुरीतील आगीचे किटाळ उडून अंगावरील साडीवर पडल्याने साडीने पेट घेतला.

ही बाब काही अंतरावर उभ्या असलेल्या वैभवच्या लक्षात येताच त्याने तिच्या अंगावर पाणी टाकून आग आटोक्यात आणली. त्यानंतर जखमी झालेल्या आईला आधी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेऊन अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेले होते. तब्येतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने वैभवने आईला पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 09/Dec/2024