रत्नागिरी : शहरातील एकता मार्ग येथील बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई बुधवार २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. दिलीप वसंत धनावडे (२४, रा. आनंदनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी तो एकता मार्ग येथील बंद टपरीच्या आडोशाला लोकांकडून स्वतःच्या फायद्यासाठी पैसे स्वीकारून कत्याण मटका जुगार खेळ चालवत असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 27-09-2024