खेड : जगातील सर्वोच्च उंच शिखर म्हणून ओळखला जाणारा माउंट एवरेस्ट पर्वत सर करण्याचे स्वप्न हे प्रत्येक गिर्यारोहकाचे असते. शहरातील प्रसिद्ध डॉ. उपेंद्र तलाठी व त्यांच्या पाच मित्रांनी मिळून माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची चढाई यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून ओळखला जाणारा माउंट एव्हरेस्ट हा पर्वत नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर आहे. या ठिकाणी दोन बेस कॅम्प असून, दक्षिण बेस कॅम्प हा नेपाळमधून, तर उत्तर बेस कॅम्प हा तिबेट देशात आहे. हा बेस कॅम्प समुद्र सपाटीपासून ५३६४ मीटर तर १७ हजार ५९८ फूट उंचीवर आहे. असा हा कठीण आणि अवघड ट्रेक प्रसिद्ध डॉ. उपेंद्र तलाठी आणि जोगेश साडविलकर, अभय तलाठी, संदीप साडविलकर, संकेत बुटाला, दौंड येथील डॉ. संदीप कटारिया यांनी सर केला. डॉ. उपेंद्र तलाठी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी माउंट एव्हरेस्टचे बेस कॅम्प यशस्वीरित्या सर केल्याबद्दल त्यांचे खेड शहरातून अभिनंदन करण्यात येत आहे. हे सर्व सहकारी खेडला परतले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 27/Sep/2024