चिपळूण : चिपळूण बुरूमतळी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी व वाचकांसाठी वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण शहर व परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे. प्रत्येक गटात प्रत्येक शाळेतील तीन स्पर्धकांना सहभागी करून घेतले जाईल. वक्तृत्व स्पर्धा १२ जानेवारीला सकाळी १० वा. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.
वक्तृत्व स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी प्राथमिक गट कालावधी चार मिनिटे विषय १. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग, २. मला आवडलेले पुस्तक. इयत्ता आठवी ते दहावी माध्यमिक गट कालावधी पाच मिनिटे विषय- १. मला भावलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, २. अहिल्याबाई होळकर यांचे समाजकार्य. खुला गट कालावधी सात मिनिटे. विषय १. राष्ट्रप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, २. प्रदूषणाचा भस्मासुर – माझी जबाबदारी.
निबंध स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी प्राथमिक गट शब्द मर्यादा २०० शब्द. विषय १. डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांचे बालपण, २. निसर्ग माझा सोबती. इयत्ता आठवी ते दहावी माध्यमिक गट शब्द मर्यादा ५०० शब्द. विषय – १. डॉक्टर बाबासाहेबांचे ग्रंथ प्रेम, २. गडकिल्ल्यांची माहिती. खुला गट शब्द मर्यादा १००० शब्द विषय- १. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान, २. कोविड नंतरचे जग.
निबंध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे निबंध ३० डिसेंबर २०२४ पर्यंत वाचनालयात सादर करावेत. निबंध लिहिलेल्या कागदावर स्पर्धकांनी स्वतःचे नाव लिहू नये. त्यासोबत स्वतंत्र माहिती असलेला कागद जोडावा. वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेकडून, खुल्या गटातील स्पर्धकांनी आपली नावे वाचनालयाकडे ३० डिसेंबर २०२४ पर्यंत कळवावी, असे आवाहन वाचनालयाच्यावतीने अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष सुनिल खेडेकर, कार्यवाह सुमेध करमरकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 11/Dec/2024