बंधारे बांधण्याची लोकचळवळ व्हावी : सीईओ किर्तीकिरण पुजार

खेड : नदीवर बंधारे बांधल्याने पाणी जमिनीत जिरून भूजल पातळी वाढते. यामुळे बंधारे बांधण्याची लोकचळवळ निर्माण व्हावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी येथे व्यक्त केली. तालुक्यातील देवघर येथील नदीवर लोकसहभाग व श्रमदानातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

पंचायत समिती खेडच्या कृषी विभागाने पुढाकार घेत महात्मा फुले जलभूमी अभियान अंतर्गत लोकसहभाग व श्रमदानातून तळे देवघर येथील नदीवर पंचायत समितीचे विविध विभाग व तळे, देवघर-सोंड्ये ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने ५० मीटर लांबीचा विजय बंधारा उभारण्यात आला.

यावेळी किर्तीकिरण पुजार म्हणाले, सर्वांनी सामाजिक जाणीव म्हणून एक पुण्याचे काम करावे. कोकणात सरासरी ३५०० मिमी. पाऊस पडूनही उन्हाळ्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण होते.

यावरती सर्वात सोपा उपाय म्हणजे नदी-नाले यावरती कच्चे, विजय व वनराई बंधारे साखळी स्वरुपात बांधले पाहिजे.

यावेळी लाल केळीचा प्रचार व प्रसार होणेकरीता प्रतिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना लाल केळीचे मुनगे वाटप व विद्यार्थ्यांना शेतीची ओढ लागावी यासाठी विद्यापीठाची दैनंदिनी मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांचे हस्ते वाटप् करण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, कृषी विकास अधिकारी सुनील खरात, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक सहायक गटविकास अधिकारी डॉ. करपे, गट शिक्षणाधिकारी विजय बाईत, विकास मुळिक उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच शामराव मोरे, सरपंच सुनील मोरे, उपसरपंच संतोष डांगे, नामदेव सोंडकर, सदस्य रवींद्र इंगळे, भरत महाडीक, शत्रुघ्न मोरे, ग्रामपंचायत अधिकारी रोहन क्षीरसागर, दीपक कदम, कृषी अधिकारी एस. के. धनवटे, विस्तार अधिकारी डी. टी. राणे, सुनील गावडे, मुरलीधर कुरई यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 12/Dec/2024