रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात छंदोत्सवाचे आयोजन १६ ते २१ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे. छंदोत्सव म्हणजेच विविध छंदांचा उत्सव.
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पलीकडे त्यांच्या सुप्त कलागुणांना कौशल्यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा व विद्यार्थ्यांना रंगमंचावर पदार्पणाची संधी देणारा, सर्जनशीलतेचे सप्तरंग विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत करणारा हा उत्सव आहे.
या अंतर्गत १६ डिसेंबरला दुपारी २.३० वा. जवाहर क्रीडांगण येथून शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरवात होईल. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध प्रदर्शनांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये फोटोग्राफी, रांगोळी, चित्रकला स्पर्धा, हस्तकला प्रदर्शन व फूडफेस्टचे मान्यवरांच्या हस्ते होईल. ४ वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा व ४.३० वा. शामराव करंडक एकांकिका स्पर्धा उद्घाटन होईल. ५ वा. एकांकिका स्पर्धेला प्रारंभ होईल. शब्द एक आविष्कार अनेक हे सूत्र असलेल्या या स्पर्धेत यावर्षी अस्तित्व हा शब्द देण्यात आला आहे. १७ ला सकाळी १० दहा वा. घंटानाद सन्मान प्रदान केला जाईल. त्यानंतर गीतगायन स्पर्धा, एकल नृत्य व समूह नृत्य स्पर्धा, विविध गुणदर्शन असे कार्यक्रम व नंतर विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभात सन्मानित करण्यात येईल. १८ ला सकाळी ८ वा. मान्यवरांच्या हस्ते मैदानी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 14-12-2024