दापोली : आंबा व काजू बागेतील वणव्यात ७८ झाडे खाक

दापोली : तालुक्यातील बुरोंडी गावाजवळ असणाऱ्या तेलेश्वर नगर येथे वणव्यात आंबा व काजू बागायतदार शांताराम रांगले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत शांताराम रांगले यांची आंब्याची २३ व काजूची ५५ झाडे जळून खाक झाली.

दापोली तालुक्यातील बुरोंडी ग्रामपंचायतीत तेलेश्वर नगरामध्ये शांताराम रांगले यांची आंबा व काजूची मोठी बागायत आहे. या बागायतीला शनिवारी सकाळी अचानक मोठी आग लागली. या आगीमध्ये शांताराम रांगले यांच्या मालकीच्या २३ आंब्याच्या व ५५ काजूची झाडे खाक झाली.

या बागेतील काजूच्या झाडांना मोहोर आला होता. आंबा कलमांनाही मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे चांगले पीक येण्याची आशा रांगले यांना होती. परंतु बागेत अचानक वणवा लागल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 16/Dec/2024