रायपाटणच्या हरिओम शिंदेची निमलष्करी दलात निवड

राजापूर : तालुक्यातील रायपाटण गावचा सुपुत्र हरिओम महादेव शिंदे (२३) याची देशाच्या निमलष्करी दलात (पॅरामिलिटरी फोर्स) चीन सीमेवर नियुक्ती झाली आहे.

गाव परिसरातून हरिओम याचे अभिनंदन करण्यात येऊन त्याला शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षे हरिओमने आपले ध्येय गाठण्यासाठी अपार मेहनत घेतली होती. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि भारताच्या निमलष्करी दलात (पॅरामिलिटरी फोर्स) हरिओम शिंदे चीन बॉर्डरवर निवड झाली आहे. या निवडीनंतर या सुपुत्राला रायपाटण परिसरामधून हरिओम याला रायपाटण परिसरातून देशसेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 17/Dec/2024