रत्नागिरीतील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण ४ ऑक्टोबरला

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे. या हॉस्पिटलचे लोकार्पण आता दि. ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. रत्नागिरीत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे, हे पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वप्न होते. सर्वसामान्य जनतेला सर्व प्रकारचे उपचार, तपासण्या, शस्त्रक्रिया मोफत मिळाव्यात यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केला. आता त्यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प पूर्ण झाला असून, केवळ लोकार्पण सोहळा होणे बाकी आहे.

प्रथम या हॉस्पिटलचे लोकार्पण २ ऑक्टोबर रोजी करण्याचे निश्चित झाले होते. त्यानंतर ३ ऑक्टोबर ही तारीख लोकार्पणासाठी निश्चित करण्यात आली होती. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये बदल झाल्याने पुन्हा हॉस्पिटलच्या लोकार्पणाची तारीख बदलली आहे. आता ४ ऑक्टोबर रोजी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेत यासाठी पालकमंत्र्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 28/Sep/2024