भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या पूर्वप्रशिक्षणासाठी रत्नागिरीत ७ जानेवारीला मुलाखत

रत्नागिरी : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारीपदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीएसडी) परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे नवयुवक व नवयुवतीसाठी २० जानेवारी ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत सीएसडी कोर्स आयोजित करण्यात येत आहे.

प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी येथे ७ जानेवारी रोजी स. ११ वा. मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीला येताना सैनिक कल्याण विभाग पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या वेबसाईट सीएसडी ६४ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र, त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट व ते पूर्ण भरुन सोबत घेवून यावे. माहितीसाठी ०२५३-२४५१०३२ क्रमांकावर संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 18/Dec/2024