गुहागर : भारतीय जनता पार्टीकडून सध्या गुहागर विधानसभा क्षेत्रात महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
सहभागी प्रत्येक महिलेला काठापदराची साडी आणि विजेत्या महिलांना पैठणी भेट दिली जात आहे. त्याचप्रमाणे आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, वाडी मंडळाच्या अध्यक्षा आदींचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तालुक्यातील मळण, शृंगारतळी, अंजनवेल, तळवली या पंचायत समिती गणासह, शहर आणि वहाळ जिल्हा परिषद गट आणि कामथे व कापसाळ या क्षेत्रातील कार्यक्रम झाले. अडूर, वेळणेश्वर, शीर, पडवे, खोडदे पंचायत समिती गणाचे कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. मळण जिल्हा परिषद गटासाठी शृंगारतळी येथे तर अंजनवेल पंचायत समिती गण व गुहागर शहराचा कार्यक्रम भंडारी भवनमध्ये झाला. खेड तालुक्यातही अशा प्रकारचा कार्यक्रम होणार आहे.
गुहागरमधील खेळ पैठणीचा स्पर्धेत समीक्षा मोरे, पूर्वा घोरपडे, प्रमिला भोसले, मळण-वेळंब पं. स. गणातील स्पर्धेत सिमरन बारगोडे, रिया विचारे, अमिषा कुंभार, चित्रा हेदवकर, नंदिनी आरवलकर यांनी अनुक्रमे यश मिळविले. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 28/Sep/2024