रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कुलकर्णी सेवानिवृत्त

रत्नागिरी : गोगट जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, विद्यमान उपप्राचार्य, पीएचडी मार्गदर्शक डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे माजी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनिल कर्णिक व रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांच्या हस्ते डॉ. कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. राधाबाई शेट्ये सभागृहात हा कार्यक्रम झाला.

डॉ. कुलकर्णी यांनी महाविद्यालयात २७ वर्षे शैक्षणिक सेवा दिली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात दोन वर्षे तर वरिष्ठ महाविद्यालयात ३५ वर्ष कार्यरत राहिले. व्याख्याता, प्राध्यापक, रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाचा समन्वयक, साडेतीन वर्ष प्रभारी प्राचार्य ही पदेसुद्धा त्यांनी सांभाळली.

एमपीएससी, ऑलिंपियाड पेपर सेंटर, मराठी विज्ञान परिषद या संस्थेचे उपाध्यक्ष, जवळपास ३० राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेतील उत्तम संशोधक सादरकर्ता बहुमान, एनएसएसचे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणूनही चांगली कामगिरी केली. कार्यक्रमाला सहकार्यवाह श्रीकांत दुद्‌गीकर, आनंद देसाई, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मिलिंद गोरे, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकणों आदी उपस्थित होते. डॉ. कर्णिक यांनी एम.एस्सी. रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 28/Sep/2024