रत्नागिरी : भोस्ते (ता. खेड) घाटातील अनोळखीचा मृतदेह आणि त्या प्रकरणाशी संबंधित सावंतवाडील तरुणाला पडलेले स्वप्न या प्रकरणाचे गूढ अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासात योगेश पिंपळ आर्या (३०, रा. आजगाव, सावंतवाडी) या तरुणाच्या जबाबातील विसंगती आता समोर येऊ लागली आहे. त्या मृतदेहाच्या शोधासाठी त्याचा झालेला प्रवास, पोलिसांत दिलेली खबर आणि आता नव्याने तो तरुण एकतर्फी प्रेमाच्या मानसिक प्रभावाखाली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्या तरुणाची मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे.
योगेश या सावंतवाडीतील तरुणाला पडलेल्या स्वप्नामुळे भोस्ते घाटातील अनोळखी मृतदेहाचा उलगडा झाल्याचा अचंबित करणारा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाच्या तपासणीसाठी स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आली आहेत. मात्र अजूनही ठोस पुरावा मिळालेला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 28-09-2024