रत्नागिरी : बहुजन समाज पार्टीकडून मंगळवारी (दि. २४ डिसेंबर) होणाऱ्या देशव्यापी निदर्शनांमध्ये रत्नागिरी जिल्हाही सामील होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत अपशब्द वापरून अपमान केला होता.
या घटनेचा भारतभर तीव्र निषेध केला जात आहे. परभणी येथील पोलीस प्रशासनाने केलेल्या आंबेडकरी आंदोलकांवर अत्याचाराबाबत बहुजन समाज पार्टीच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात बसपाचे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांनी तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व संघटनांनी मनुवादी व्यवस्थेविरोधात एकत्र येऊन या घटनांचा धिक्कार करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश सचिव राजेंद्र आयरे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 24-12-2024