कोरे मार्गावर पुणे-करमाळी साप्ताहिक स्पेशल ट्रेन

खेड : कोकण मार्गावर नववर्षाच्या स्वागतासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेली पुणे-करमाळी साप्ताहिक स्पेशल २५ पासून धावू लागली आहे.

पुणे-करमाळी साप्ताहिक स्पेशल २५ डिसेंबर, १ व ८ जानेवारी धावेल. पुणे येथून पहाटे ५.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता करमाळी येथे पोहचेल. या स्पेशलला चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम स्थानकांत थांबे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 26/Dec/2024