खेड : खारी-देवणं पुलानजीक गोवंश जनावरांचे अवशेष आढळल्यानंतर गोहत्या करणाऱ्यांचा कसून शोध घेण्यात आला असता आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. चौघेही पोलीस कोठडीत आहेत.
चौघांनाही २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जनावरांच्या तस्करीचे रॅकेट उघडकीस आणणार असून त्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे. गोहत्या प्रकरणाच्या मुळाशी जावून उलगडा करताना कोणाचीही गय केली जाणार नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
खारी-देवणं पुलानजीक झालेल्या गोहत्या प्रकरणानंतर धनंजय कुलकर्णी दुसऱ्यांदा मंगळवारीही प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी येथे आले होते. पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले. गोहत्या प्रकरणात टोळी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने पोलीस यंत्रणा तपास करत असून गुन्हा अन्वेषणचे पथकही साऱ्या शक्यतांचा पडताळा करत आहेत. आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असली तरी आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता तपासकामात
पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहनही केले. याप्रसंगी चिपळूणचे पोलीस उपविभागीय उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक नितीन भोयर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 26-12-2024