रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी मध्ये विविध कार्यक्रम करण्यात आले.
सर्वप्रथम ग्रामदैवत भैरी चरणी साहेबांना उदंड आयुष्य मिळावं म्हणून अभिषेक व प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर शाळा क्रमांक आठ येथे विभाग प्रमुख बाळू गांगण व बाबा चव्हाण यांच्या वतीने बालवाडीतील मुलांना खेळण्याचे साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आला. त्यानंतर चंपक मैदान येथे असलेल्या गोशाळेला औषध व खाद्य देण्यात आली. त्यानंतर आशादीप येथील संस्थेमधील मुलांना गरजेचे साहित्य व धान्य देण्यात आले. त्यानंतर माहेर येथील संस्थेतील मुलांना जीवनाशी वस्तू जीवनावश्यक वस्तू व साहित्य देण्यात आले.
त्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुलजी पंडित साहेब, शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजन शेटे साहेब, विभाग प्रमुख राहुल रसाळ नगरसेवक बंटी कीर नगरसेवक राकेश नागरेकर, नगरसेवक विकास पाटील युवा सेना शहर प्रमुख अभिजीत दुडे, विभाग प्रमुख बाळू गांगण, शाखाप्रमुख राहुल पिळणकर, स्वप्निल मयेकर शशिकांत आलीम, संघटक मनीषा बामणे, शहर संघटक सौरव मुलुस्टे उपशहरप्रमुख बावा चव्हाण विभाग प्रमुख मनोज साळवी, नगरसेविकास श्रद्धा हळदणकर, संजय हळदणकर, नगरसेवक सोहेल मुकादम, जकी खान, विभाग प्रमुख संजय नाईक उपविभाग प्रमुख आशु मोरे बंटी गुरव, उपविभाग प्रमुख सुनील शिवलकर विभाग प्रमुख दीपक पवार, राजेश आराध्यमठ नरेंद्र देसाई सुनील कीर दुर्वेश पांगम, निधी शिवलकर, आप्पा पुनासकर, प्रसन्ना पिलाणकर,संतोष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:34 26-12-2024