ग्राहक कायद्यासंदर्भात प्रत्येकाने जागरुक राहणे गरजेचे : अ‍ॅड. दिलीप चव्हाण

खेड : ग्राहकांच्या विविध तक्रारी शासन दरबारी मोठ्या संख्येने येऊ लागल्या आहेत. जास्त ग्राहक संरक्षण कायदा 1986 ला शासनाने नागरिकांसाठी केला असला तरी ग्राहकांची फसवणूक होतच आहे. काही लोक तक्रार मंच कडे धाव घेतात तर काही लोक उपजव्या नकोय, म्हणून गप्प बसतात व झालेले नुकसान मुकाट्याने सहन करतात तरी प्रत्येक नागरिक हा ग्राहक असून त्यांनी आपले हक्क आणि जबाबदारीची जाणीव ठेवून वागल्यास पुढील अनर्थ टळेल, असे प्रतिपादन सिद्ध योग विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक, खेड कोर्टातील अ‍ॅड. दिलीप चव्हाण यांनी नुकतेच तहसील कार्यालय खेड येथे प्रतिपादन केले. ते ग्राहक संरक्षण दिनानिमित्त मार्गदर्शनपर बोलत होते.

आपली फसवणूक झाली आहे याची खात्री करून संबंधित पुराव्यासहित तक्रार असेल त्याप्रमाणे जिल्हा,राज्य आणि राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडे विना विलंब आपली तक्रार नोंदविली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.

खेड तहसीलदार सुधीर सोनवणे, श्रीकांत चाळके, कांबळे, नायब तहसीलदार देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रसिका ढवळ, दिनकर चव्हाण व नागरिक उपस्थित होते. पत्रकार दिवाकर प्रभू यांनी सूत्रसंचालन केले. ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत चाळके यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात शेवटी दिनकर चव्हाण यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 30-12-2024