रत्नागिरी : देशातील सर्वधर्मिय ६० वर्षांवरील ज्येष्ठांना देशभरातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करून देण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे तीर्थ दर्शन योजना १८ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आली. या योजनेचा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत, म्हणजेच १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ६० वर्षांवरील एकूण ६ हजार ६९१ ज्येष्ठांनी लाभ घेतला आहे.
तीर्थ दर्शन योजनेत देशातील ७३ प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश होता. यासाठी शासनाकडून खर्चापोटी ३० हजार रुपये दिले जात होते. तीर्थ दर्शन या योजनेत महाराष्ट्रातील प्रमुख ६६ तीर्थक्षेत्रांचा समावेश होता. यापैकी एका तीर्थक्षेत्राचा लाभ घेता येत होता.
सामाजिक न्याय विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश ६० वर्षांवरील ज्येष्ठांना तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा घडवून आणणे हा होता. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून यासाठी ३० हजार रुपयांचा खर्च शासनाकडून करण्यात आला आहे. शासनाच्या ‘तीर्थ दर्शन’ या योजनेसाठी ऑगस्ट ते विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत, म्हणजेच १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातून ६० वर्षांवरील २९ हजार ५३० लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी ६ हजार ६९१ लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरले. या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे ‘तीर्थ दर्शन’ साठी निधी वितरीत करण्यात आला असल्याचे समाज कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या तीर्थ यांत्रांना जाऊन मन:शांती तसेच आध्यात्मिक आनंद मिळावा, या हेतूने ही योजना राज्य शासनाने सुरू केली होती. आर्थिक परिस्थिती नसलेल्यांना या योजनेचा लाभ दिला गेला. विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद करण्यात आली आहे; मात्र याचा लाभ जिल्ह्यातील इच्छुक ज्येष्ठांना झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 31/Dec/2024














