रत्नागिरी : जलसंधारण म्हणजे धावते पाणी चालते करणे आणि चालते पाणी थांबवणे होय. जलसंधारणाचे महत्त्व सध्याच्या पिढीला समजणे अत्यंत गरजेचे आहे, असे सुहास सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. ते गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या केळ्ये येथील विशेष निवासी शिबिरात बोलत होतो.
त्यांनी जलसंधारण या विषयावर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी पाणलोट क्षेत्र विकासासंदर्भात अभ्यासपूर्ण माहिती दिली. जलसंधारण विषयक शासकीय योजना या सर्वसामन्यांपर्यंत पोहचायला हव्यात, पण पोहचत नाहीत अशी खंतही व्यक्त केली. योजनांची वेळोवेळी दखल घेऊन त्याची पडताळणी करणे देखील सर्वसामन्यांची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे, प्रा. उमा जोशी, प्रा. हर्षदा पटवर्धन, ग्रामस्थ आणि शिबिरार्थी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:11 PM 01/Jan/2025














