रत्नागिरी : शहरालगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आहे. सकाळी दहा वाजल्यापासून या कार्यालयमध्ये शाळा, नोकरी आणि निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी उमेदवार रांगा साधून उभे असतात. दिवसाला सुमारे ३५ ते ४० अर्ज या कार्यालयात दाखल होतात गेल्या वर्षभरात समितीने ५ हजार १२२ विद्यार्थ्यांना निवडणुकीचे ७६ तर नोकरदारांसाठी १० असे एकूण ५ हजार ६५९ जणांना जातपडताळणी प्रमाणपत्र दिले. जानेवारीपर्यत या विभागाकडे १९९ अर्ज प्रलंबित आहेत, त्यामुळे या विभागाचे कामकाज अधिक गतिमान झाल्याचे दिसते, परंतु कार्यालयात येणाऱ्या अर्जदारांना समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आदराची वागणूक द्यावी आणि मार्गदर्शन करावे, असे काही अर्जदारांचे म्हणणे आहे. समितीच्या अध्यक्षांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त असल्याने स्वाक्षरीमुळे काही प्रमाणपत्र रखडले.
… तर तुमची फाईल होणार बंद
जातवैधता प्रमाणपत्र हे शिक्षण, नोकरी आणि निवडणुकीसाठी अनिवार्य आहेत. यासाठी जात प्रमाणपत्र पडताळी विभागाचे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी होते. त्यानंतर हे प्रकरण समिती कागदपत्रांची पूर्तता असल्यास समितीच्या तिन्ही पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी होऊन ३ ते ६ महिन्यांमध्ये हे प्रमाणपत्र दिले जाते, परंतु काही त्रुटी असल्यास संबंधिताला एसएमएस किंवा मेलद्वारे कळवत येते. ४५ दिवसांच्या आत त्यांनी त्रुटी सादर करायच्या आहेत. तसे न केल्यास त्यांची फाईल बंद केली जाते; परंतु पुन्हा अर्ज करता येतो. या फाईलचा रेफरन्स दिल्यास ते काम अधिक जलद गतीने होते. यापूर्वी समितीवरील पदाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार असल्याने त्यांना वेळ देता येत नव्हता. तेव्हा काही हजारात अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण होते. वेळेत जातवैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे शैक्षणिक वर्ष, नोकरी किंवा निवडणुकीत अडचणी आल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष न्याय विभागने समितीवरील आवश्यक पदांची भरती केली आहे.
शैक्षणिक प्रवेशासाठी सवलत
शासन निर्णय जुलै २०२४ अन्वये राज्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग (एसईबीसी) प्रवर्गासाठी २०२४-२५ मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी लक्षात घेऊन शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी, प्रवेशासाठी अर्ज कल्पाच्या दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
सहा महिन्यांच्या कालावधींनी संबंधित उमेदवाराने जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार व्यक्तीगत जबाबदार राहतील, असे शासनाचे आदेश आहेत.
कर्मचाऱ्यांनी आदराने वागावे
जिल्ह्याच्या एका टोकावरून अनेक विद्यार्थी, नोकरदार तसेच राजकीय नेते जात प्रमाणपत्र पडताळणी विभागात येतात. अनेकांना अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया माहीत नसते. त्यामुळे तिथे असेल त्या व्यक्तीची ते मदत मागतात; परंतु अनेकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असल्याने त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. ते गोंधळून जातात. एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे गेले तरी त्यांना समजावून सांगण्याची त्यांची मानसिकता नसते. त्यामुळे एवढे चांगले काम करून हा विभाग बदनाम होत आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अर्जदारांशी आदराने वागावे आणि मार्गदर्शन कराये, अशी किमान अपेक्षा काही अर्जदारांनी व्यक्त केली.
आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध
जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाचे काम सुरळीत व्हावे यासाठी खासगी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. यामुळे कामांचा उरक सुरू आहे. आस्थापनेवरील मंजूर दहा पदे आहेत, तर खासगी पाच कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तीन पदाधिकाऱ्यापैकी अध्यक्षपद आता रिक्त आहे. अध्यक्षांना बढती मिळाल्यामुळे हे पद रिक्त आहे. उर्वरित दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रांवर स्वाक्षरी झाल्या आहेत. ७ जानेवारीपर्यंत १९१ अर्ज या विभागाकडे प्रलंबित आहेत. हे पद भरल्यास कामात अजून सुसूत्रता येणार आहे.
अर्ज आल्यानंतर छाननी करून तो समितीपुढे आल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी असल्यास संबंधितांना एसएमएस किंवा मेलद्वारे त्रुटी कळवण्यात येतात. त्यांची पूर्तता झाल्यास लगेच अर्ज मंजूर करून जातवैधता प्रमाणपत्र दिले जाते. अर्ज प्रलंबित असण्याचे प्रमाण कमी आहे. रविंद्र कदम, कार्यालयीनाप्रमुख, रत्नागिरी समितीकडे येतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 14/Jan/2025
