रत्नागिरी : डाव प्रतिडावांनी रंगलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेतून राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी १०, महिला गटासाठी ४ आणि कुमार गटातील १४ अशा २८ जणांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा हा संघ राज्य स्पर्धेत सहभागी होणार आहे.
राज्य क्रीडादिनानिमित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरीअंतर्गत जिल्हा कुस्ती असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धा १२ डिसेंबर रोजी गुरूकृपा मंगल कार्यालय रत्नागिरी येथे पार पडल्या.
पैलवान खाशाबा जाधव जयंतीचे औचित्य साधत राज्य क्रीडा दिन साजरा केला जातो. या निमित्त जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जगताप यांच्या हस्ते पार पडले. या वेळी जिल्ह्यातील कुस्तीपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डाव प्रतिडावांनी रंगलेल्या या कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी संस्कार लटके, मारूती बिरजे, आनंद तापेकर, तेज जावळे, साहिल खटकुळ, अथर्व घोले, रोहित चिले, अतुल गराटे, साहिल धांगडे, भावेश सावंत तर महिला गटात सायली यादव, कमल नितोरे, सायली लटके, सानिया कांबळी विजयी झाल्या. कुमार गटात मैथिली शिनगारे, तन्वी सागवेकर, रिया आग्रे, शमिका कदम, कीर्ती सावंत, मेहबूब शेख, राजेश रब्बी, शौर्य जाधव, वेदांत नागले, यश जावळे, नियाज मुल्लानी, गौरव नागले, वरद ताम्हणकर, दुर्वांक नागले हे विजयी झाले.
या प्रसंगी व्हॉलीबॉल मार्गदर्शक गणेश खैरमोडे, जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण विलणकर, कार्यवाह सदानंद जोशी, डॉ. चंद्रशेखर केळकर, संतोष कदम, अमित विलणकर, योगेश हरचेकर, वैभव चव्हाण, आनंद तापेकर, फैयाज खतिब, निलम कुलकर्णी, राज नेवरेकर, अंकुश कांबळे, स्वप्नील घडशी आदी उपस्थित होते.
त्या स्पर्धेचा चाचणीवर प्रभाव
रत्नागिरी जिल्हा मल्टिपल स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या लाल मातीतील कुस्त्यांच्या स्पर्धेमुळे गेले काही दिवस रत्नागिरीतील वातावरण कुस्तीमय झाले आहे. त्या स्पर्धेत राज्यातील कसलेले पैलवान मैदानात उतरलेले होते. त्यांचे पैरपैतरे पाहण्यासाठी रत्नागिरीतील नवोदित तरुणही सरसावलेले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत सहभागी रत्नागिरीतील नवोदित कुस्तीपटूंनी त्या पैलवानांनी वापरलेले पैरपैतरे प्रत्यक्ष मैदानात दाखवण्याचा प्रयत्न केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 15-01-2025
