बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान(Saif Ali Khan)वर गुरूवारी पहाटे वांद्रे येथील त्याच्या घरी त्याच्यावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला. त्याला पहाटे ३.३० वाजता लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता हॉस्पिटलमधून अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात पहाटे चोर शिरला होता. त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीसोबत झटापट झाली. तिचा आवाज ऐकून अभिनेता आला. त्यानंतर चोराने धारदार शस्त्राने सैफवर सहा वेळा हल्ला केला. यात अभिनेता गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची सर्जरी झाली आहे. हे वृत्त समजल्यापासून त्याचे चाहते चिंतेत आहेत. दरम्यान आता रुग्णालयातून अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
सैफ म्हणाला…
सैफ अली खानने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याने हॉस्पिटलमधून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, हल्ला झाला आहे. शांतता राखा. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्याने सांगितले. आता तो धोक्यातून बाहेर पडला आहे. सैफच्या हातासोबतच त्याच्या शरीरावरही काही ठिकाणी जखमा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
घरातील तीन नोकरांना घेतले ताब्यात
चोर घरात कसा घुसला याचा पोलीस शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे तिघेही घरातील नोकरदार आहेत. हल्लेखोराने यापूर्वी या घरात काम केले असावे आणि कामावरून काढले असेल. याचा बदला घेण्याच्या उद्देशाने तो घरात घुसला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत. सैफ अली खान आणि करीना कपूर आपल्या दोन मुलांसोबत जिथे राहतात त्या इमारतीत तीन लेयर सिक्युरिटी आहे, मात्र त्यानंतरही हे कसे झाले हा प्रश्नच आहे.
संध्याकाळपर्यंत अभिनेत्याला मिळू शकतो डिस्चार्ज
सैफ अली खानवर रुग्णालयात उपचार सुरू असून संध्याकाळपर्यंत अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 16-01-2025
