Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
हल्लेखोराने सैफ अली खानच्या घरात मागच्या बाजूने प्रवेश केला होता. सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या मदतनीसला भेटण्यासाठी हल्लेखोर घरात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सैफवर हल्ला करण्याअगोदर हल्लेखोर सैफ-करीनाचा मुलगा तैमुरच्या खोलीकडे जात होता. हल्लेखोराला तैमुरच्या खोलीच्या दिशेने जाताना सैफच्या घरातील मोलकरणीने पाहिलं आणि आरडाओरडा केला. हल्लेखोराने मोलकरणीवरच्या हातावरही चाकूने हल्ला केला.
मोलकरणीने आरडाओरडा केल्यानंतर बाजूच्याच खोलीत झोपलेला सैफ अली खान जागा झाला आणि बाहेर आला. सैफने हल्लेखोर आणि मोरकणीला पाहिलं आणि हल्लेखोरला रोखण्यासाठी तो धावला. या झटापटीत हल्लेखोराने सैफवर चाकूने ६ वार केले. यात सैफ गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती वांद्रे पोलिसांनी दिली आहे.
सैफच्या मोलकरणीच्या हाताला दुखापत झाली असून तिची चौकशी करण्यात येत आहे. सैफच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सीसीटीव्हीमध्ये प्रवेश दिसत नाही. ती व्यक्ती घरात कशी घुसली याचा शोध घेण्यासाठी पोलिस सैफच्या घरी आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अभिनेत्याच्या घरातील चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. घरात घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी या चार जणांना ताब्यात घेतलं आहे, त्याचबरोबर त्यांचे फोन देखील ताब्यात घेतले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 16-01-2025
