आरे प्रीमियर लीग स्पर्धेत ओवी इलेव्हन संघ विजेता

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील आरे येथे आयोजित आरे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ओवी इलेव्हन संघाने बाजी मारली. तर वारे येथील घोडपदेव संघ उपविजेता ठरला. या क्रिकेट स्पर्धेला क्रिकेट प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद लावला. याशिवाय यू ट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

आरे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत 12 संघानी सहभाग लावला होता. बोली पद्धतीने संघातील खेळाडूंची निवड करण्यात आली होती. आरे प्रीमियर लीगचा अंतिम सामना ओवी इलेव्हन आरे विरुद्ध घोडपदेव वारे या दोन तुल्यबळ संघांमध्ये झाला.

ओवी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन दाखवत ओवी संघाने पाच षटकात घोडपदेव संघासमोर 59 धावांचे उद्दिष्ट ठेवले. ओवी संघाने दिलेले 59 धावांचे लक्ष घोडपदेव संघाचे फलंदाज पार करू शकले नाहीत. त्यांचा संघ केवळ 24 धावांच करू शकला. 35 धावांनी ओवी इलेव्हन संघाने हा सामना जिंकत आरे प्रीमियर लीग स्पर्धेवर आपले नाव कोरले.

स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून श्रावण हर्चरकर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रोहन करमरकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून विराज सनगरे यांची निवड करण्यात आली. तर अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून आणि संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून श्रावण हर्चरकर याची निवड करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:29 30-04-2026