मनू भाकर परत करणार ऑलिम्पिक पदक! कारण काय?

नवी दिल्ली : स्टार नेमबाज मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली खेळाडू ठरली. मात्र, तिचा हा आनंद अवघ्या पाच महिन्यांमध्ये लुप्त होत चालला आहे. कारण, तिने जिंकलेल्या दोन्ही कांस्य पदकांचा रंग फिका पडत असून, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओए) तिच्याकडून हे पदक परत मागवले आहेत.

या बदल्यात तिला नवी पदके दिली जाणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जिंकलेल्या पदकांचा रंग उडत असल्याची तक्रार आतापर्यंत जगभरातून शंभरहून अधिक खेळाडूंनी केली आहे. याची दखल ‘आयओए’ने घेतली आहे.

ऑगस्टपासून काम सुरू
मोनने डी पॅरिस या संस्थेने ही पदके तयार केली आहेत. या कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले की, ‘हे मेडल खराब नाहीत. बहुतांश पदकांचा केवळ रंग उडाला आहे. हे पदक आम्ही बदलून देत आहोत. पदक बदलण्याचे काम ऑगस्टपासून सुरू आहे.’

१८ ग्रामचा लोखंडी षटकोन वेधतो लक्ष
पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकांची विशेष पद्धतीने निर्मिती करण्यात आली होती. ऐतिहासिक आयफेल टॉवरच्या लोखंडापासून सर्व पदके बनविण्यात आली असून, पदकाच्या वरील भागावर सुमारे १८ ग्राम लोखंडचा षटकोन बनवला आहे. तसेच, पदकाच्या वरील भागावर आयफेल टॉवरची आकृतीही तयार करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 16-01-2025