Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री हल्ला झाला. चाकूने त्याच्यावर 6 वार करण्यात आले. त्यातील दोन वार हे अत्यंत खोलवर होते.

दरम्यान, त्या आरोपीचा आता पत्ताच नाही तर फोटो सुद्धा मिळाला आहे. पोलिसांनी याविषयीचे सीसीटीव्हीतील फुटेजमधील आरोपीचा फोटो शेअर केला आहे.

पोलिसांच्या 15 टीमकडून तपास

सैफ अली खानवर मध्यरात्री हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवले होते. दरम्यान घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली. तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या 8 टीम स्थापना करण्यात आल्या. तर मुंबई पोलिसांच्या 7 टीम तयार करण्यात आल्या. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एकूण 15 टीमकडून तपास करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:32 16-01-2025