माखजन : सेवेची १२ वर्षे व २४ वर्षे झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. या कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण अद्याप झाले नसल्याने संबंधित शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत.
शासनातर्फे मध्यंतरी ऑनलाईन पद्धतीने वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण घेतले जात होते. परंतु काही महिन्यांपूर्वी हे प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने जिल्हा प्रशिक्षण कार्यालयातर्फे घेण्यात येईल, असे परिपत्रक काढले होते. परंतु शैक्षणिक वर्ष संपत आले तरी हे प्रशिक्षण न झाल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पूर्वी शासकीय नियोजनाप्रमाणे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण लागल्यावर वेळेत पूर्ण करेन या हमीपत्रावर वरिष्ठ व निवडश्रेणीचा लाभ संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याला लाभ दिला जायचा. परंतु आता प्रत्यक्ष प्रशिक्षण झाल्याशिवाय वेतनात लाभ मिळत नसल्याने १२ वर्षे सेवा झालेल्यांना वरिष्ठ व २४ वर्षे सेवा झालेल्यांना निवड श्रेणी पासून वंचित रहावे लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 18/Jan/2025












