रत्नागिरी : रत्नागिरीत उरली सुरली उबाठा देखील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. येत्या २४ तारखेनंतर ते उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. उबाठा चे नेते आणि माजी खासदार विनायक राउत आज रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी बंड्या साळवी यांच्या बाबत भाष्य केले.
बंड्या साळवी यांची जागा घेण्यासाठी आमच्याकडे १० जण तयार आहेत. कितीही गद्दार आले आणि गेले तरी निष्ठावंतांची फळी तयार आहे. गद्दार लोकांच्या काळजीने आम्ही झुरून जाणार नाही. बंड्या साळवी यांनी शिवसेना सोडल्यास आम्हाला फार दुख होणार नाही, जाणारे जातील, जे राहतील त्यांच्या जीवावर शिवसेना उभी करण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे. कडवट शिवसैनिक तेव्हढ्याच ताकतीने उभे राहतील. जो पर्यंत गाद्दरीला खतपाणी घालणारे राज्यकर्ते आहेत तो पर्यंत हे चालूच राहणार. गद्दारांना गाडण्याचे काम निष्ठावंतांनी केले आहे, त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात विनायक राउत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.














