देवरुख : कोकणातील ग्रामीण भागामध्ये आजही विविध सण, उत्सवाप्रसंगी नाट्य प्रयोग साकारण्याची परंपरा असून, ती जपली जात आहे. अशीच एक परंपरा संगमेश्वर तालुक्यातील परचुरी हे गाव जपत आहे. या गावातील नवनिर्माण मंडळ बेल्येवाडी गेली २७ वर्षे ऐतिहासिक नाट्यप्रयोग साकारत आहे. यंदा हे मंडळ ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचा २८वा प्रयोग साकारणार आहेत. गावातील नाट्यप्रयोगाला गेली ६० वर्षाहून अधिक काळाची परंपरा आहे. हे मंडळ १९९७ पूर्वी काल्पनिक व कौटुंबिक नाट्यप्रयोग सादर करत असत. ऐतिहासिक नाटक करणे अत्यंत जिकरीचे व आव्हानात्मक काम आहे. हेच आव्हान स्वीकारत ऐतिहासिक नाट्य प्रयोग करण्याचा मनसुबा या मंडळाने रचला. प्रथमच १९९७ साली ‘महाराष्ट्राचा बहुरूपी हा नाट्य प्रयोग या मंडळाने साकारला, उपस्थित रसिकांनी या प्रयोगाला उचलून धरले अन् यापुढे ऐतिहासिक नाटके करण्याचा संकल्पच या मंडळाने सोडला.
यानंतर रायगडचा रत्नेश्वर, शिवकंकण, रोहिडेश्वर, स्वातंत्र्याची सिंहगर्जना, सम्राट सह्याद्रीचा, व्यंकोजी बाप, अफजल खान, सिंहगड, राजीयांचे राजे, जाग मराठ्या जाग, बांधिली शिवरायांनी पूजा, शिलेदार भी शिवरायांचा, शिवशाहीचा शिरपेच, गायील गाथा संह्यगडा, शिवशाहीचा विजयी डंका, मराठ्यांचा शब्द अशी एकापेक्षा एक ऐतिहासिक नाट्य प्रयोग या मंडळाने साकारून ऐतिहासिक नाटकांचे आव्हान जिवंत ठेवले.
या मंडळातर्फे प्रतिवर्षी माध महिन्यातील अमावस्येला नाट्यप्रयोग सादर केला जातो. या विधीत कोणताही बदल मंडळ करत नाही. यावर्षी देखील याच तिधीला २७ फेब्रुवारी रोजी नाट्यप्रयोग होणार आहे. यावर्षी हे मंडळ परंपरा जपताना ‘सिंह शिवाजीचा’ हे नाटक सादर करणार आहेत.
मंडळाची एक खासियत अशी आहे की, ऐतिहासिक नाटकासाठी आवश्यक सर्व नैपथ्य, वेशभूषा साहित्य, साऊंड सिस्टिम, लाईट व्यवस्था या मंडळाची स्वतःची असून त्यासाठीचे देखभाल करणारे सभासद देखील या मंडळामध्ये कार्यरत आहेत. स्थानिक कलाकार आपल्या अभिनयाचे कौशल्य पणाला लावून हे नाट्य प्रयोग यशस्वी करत असतात. आज यातील जुने जागते काही कलाकार स्वर्गवासी झाले आहेत. असे असतानाही नवनवीन कलाकार घडत असून ही परंपरा जपण्याचे काम करत आहेत.
शिवशाहीचा शिरपेच या दहा वर्षांपूर्वी झालेल्या नाट्यप्रयोगाला मुंबई येथे मागणी झाली होती. पानुसार हा प्रयोग मुंबई येथील दामोदर नाट्यगृहात साकारण्यात आला. या मुंबई येथील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली होती. आजही या ऐतिहासिक नाट्यप्रयोगांना मोठमोठ्या शहरांमध्ये मागणी असते.
मात्र, येथील कलाकार हे मुंबई स्थित असल्याने ही मागणी नाट्य मंडळ पूर्ण करू शकत नसल्याचे खंत वेल्ये व घाणेकर यांनी व्यक्त केली. दरवर्षी नाट्यप्रयोग हे बहारदार होत असतात. म्हणजेच या प्रयोगातील कलाकारांचा अभिनय उंचावतच जात असतो. हे नाट्यप्रयोग पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कानाकोप-यातून नाट्यप्रेमी उपस्थित राहतात. अन कलाकारांच्या अभिनयाला दाद देतात. हीच दाद ऐतिहासिक नाट्य प्रयोग करण्यासाठी मोलाची ठरते. हे संपूर्ण नाट्य प्रयोग साकारत असताना मंडळातील सर्व पदाधिकारी, सभासद यांचे मौलिक सहकार्य लाभते यामुळेच ऐतिहासिक नाटकांचा उचललेला विडा पूर्णत्वास नेता येतो, असे वेल्ये आणि घाणेकर अभिमानाने सांगतात.
मुंबईत होते नाटकाची तालीम
मंडळामध्ये स्त्री पात्रांचा देखील अभाव आहे. असे असताना मुंबईहून स्त्री कलाकारांना निमंत्रित करून नाट्यप्रयोग पूर्णत्वास नेला जातो. आज मंडळातील काही कलाकार नोकरी, व्यवसाय निमित्त मुंर्क्स स्थित झाले आहेत. हे मुंबईमध्येच सुट्टीच्या दिवशी एकत्र येऊन निश्चित केलेल्या नाटकाची तालीम करतात. ठरलेल्या तिथीला हे कलाकार गावात येऊन हा नाट्यप्रयोग उभारत असल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी व कलाकार संजय बेल्ये व सुहास घाणेकर यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 23/Jan/2025














