रामपूर : गुहागर-विजापूर महामार्गावरील रामपूर गुढे फाटा मृत्यूचा सापळा बनला आहे. गुढे फाटा चौकात छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिलकुमार जोशी व अजित गुढेकर यांनी संबंधित विभागाकडे केली आहे. आठवड्यातून दोन ते तीन छोटे-मोठे अपघात होतात. अपघातात काहींचा मृत्युही ओढवला आहे. गुहागर, हेदवी, वेळणेश्वर, अंजनवेल, गोपाळगड, धोपावे मार्गे दाभोळ येथे पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. तसेच महामार्गावरून अन्य अवजड वाहनांची संख्याही जास्त आहे. ट्रक, टेम्पो, कंटेनर, मोठी ट्रॅव्हल्स वाहने, दुचाकी, एसटी वाहनांची सतत अत्यंत वेगाने वाहने जातात. सुसाट गतीने गुहागरकडून चिपळूणला जाणारी वाहने आहेत. दळणवळण वाढले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार जोशी व अजित गुढेकर यांनी सा. बां. विभाग चिपळूण व महामार्ग कार्यालयाशी संपर्क साधला. रामपूर ते मिरजोळी दरम्यानचा रस्ता सा. बां. विभागाकडे असून रामपूर ते मिरजोळी रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असून या दरम्यानच्या समस्यांकडे दोन्ही विभागांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 25/Jan/2025














