रत्नागिरी : ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी १ ऑक्टोबर शेती अवजारांसहित परटवणे ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला.
या मोर्चाचे नेतृत्व ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी केले. ॲल्युमिनियम प्रकल्पासाठी शासनाने शेतकर्यांच्या जमिनी अगदी कमी पैशांत संपादित केल्या. शेकडो एकर जागा ॲल्युमिनियम प्रकल्पासाठी शासनाने ताब्यात घेतल्या; पण या जमिनीवर प्रकल्प उभा राहिला नाही. ती जमीन अनेक वर्षे पडीक असून त्यात कसणार्या शेतकर्यांचे, त्यांच्या पिढीचे मोठे नुकसान झाले आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
शासनाने ज्या प्रकल्पासाठी जमिन खरेदी केली त्याला २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने संपादित केलेल्या जमिनींना आजचा भाव द्यावा, तसेच प्रकल्पग्रस्त म्हणून संबंधित मुला-मुलींना नोकरी द्यावी आणि ज्या जमिनी कसत नाहीत त्या परत द्याव्यात, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 02-10-2024
