मागण्या मान्य न झाल्याने आज पुन्हा उपोषणाला बसणार; साडवलीचे विश्वकर्मा कृषी अवजारे व इंजिनिअरिंग समूह उद्योग चे अध्यक्ष मसुरकर यांचा इशारा

देवरुख : ऑगस्टमध्ये उपोषण केल्यानंतरही मागण्या मान्य न झाल्याने येत्या गांधी जयंतीला २ रोजी पुन्हा उपोषण करण्याचा इशारा विश्वकर्मा कृषी अवजारे व इंजिनिअरिंग समूह उद्योग, साडवली ता. संगमेश्वरचे अध्यक्ष कमलाकर गोपाळ मसुरकर यांनी दिला आहे.

या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेंतर्गत सामूहिक सुविधा केंद्र कार्यान्वित करून न दिल्याने आमचे प्रचंड नुकसानामुळे उपासमार होत असल्याने सामूहिक सुविधा केंद्र कार्यान्वित करून देण्यासाठी तहसील देवरुख कार्यालयाबाहेर सामूहिक सुविधा केंद्राचे सर्व संचालकानी दि. ९ ऑगस्ट २०२४ लाक्षणिक उपोषण केले होते.

सामूहिक सुविधा केंद्राचे अध्यक्ष कमलाकर गोपाळ मसुरकर यांनी ९ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२४ पर्यंत उपोषण केले होते. त्या प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राने सामूहिक सुविधा केंद्र कार्यान्वित करून देण्याचे लेखी पत्र देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे स्थगीत केलेले उपोषण २ ऑक्टोबर २०२४ ला पुन्हा सुरू करीत आहे.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सामूहिक सुविधा केंद्र पूर्णपणे कार्यान्वित करून देणे, मुख्य घन मशिन ट्रायल घेऊन चालू करून देणे, बंद पडलेल्या इतर सर्व मशीन्स दुरुस्त करून चालू करून देणे, खंडित झालेला वीजपुरवठा पुनर्स्थापित करून देणे, थकित पाणी बिल व इतर देयके माफ करणे, सामूहिक सुविधा केंद्र मुख्य घण मशिन चालू करून न दिल्यामुळे बंद राहिले त्यामुळे गुंतवणूक केलेल्या रकमेवरचे व्याज, कंपनी चालू स्थितीत ठेवण्यासाठी कायदेशीर बाबी (ऑडीट, रजिस्ट्रार ऑफ कंपनीला वार्षिक विवरणपत्रे सादर करणे, GST (रटर्न भरणे) पूर्तता करण्यासाठी केलेला खर्च, कंपनी व मशिन्स सुरक्षा व देखभालीसाठी केलेला खर्च, कंपनी कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आलेला खर्च या सर्व खर्चामुळे सुमारे १.५ कोटींचे नुकसान झाले आहे.

त्याची भरपाई करून देणे. सामूहिक सुविधा केंद्र कार्यन्वित करून देण्याची जबाबदारी उद्योग विभागाच्या विभागीय कार्यालय ठाणे व जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी यांची होती. मुख्य मशिन वेळेत पुरवठा न करणाऱ्या कंपनीवर कोणतीही कारवाई न करता त्या कंपनीला पाठीशी घातले. मशीन वेळेत न पुरवल्या मुळे व अद्याप चालू करून न दिल्यामुळे कंपनीचे अतोनात नुकसान व उपासमारीची वेळ आली आहे. याचबरोबर कंपनी कार्यान्वित करून देण्यासाठी उद्योग विभागाकडे ४ वर्षे सतत पाठपुरावा करूनही दखल घेतली नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 02/Oct/2024