राजापूर : मुचकुंदी नदीचे आज जलपूजन

राजापूर : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई आणि वाटूळ ग्रामस्थ यांच्यातर्फे १ आणि २ फेब्रुवारीला १० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन वाटूळ येथील हरिभाऊ रामचंद्र चव्हाण साहित्य नगरीमध्ये होणार आहे. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता. ३१) मुचकुंदी नदीचे जलपूजन होणार आहे.

जलपूजन होणाऱ्या नदीकिनाऱ्यावरील जागेची संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून स्वच्छता केली.

शुक्रवारी सायंकाळी ५ वा. संत तुकाराम महाराज यांचे बारावे वंशज अमोल अशोक महाराज मोरे यांच्या हस्ते मुचकुंदी नदीचे जलपूजन होणार आहे. मोहिमेमध्ये संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, बाळकृष्ण मुरारी, प्रा. विजय हटकर, विराज चव्हाण, सुयश चव्हाण आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 31/Jan/2025

Amey jwelrs