देव कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली वारसास्थळ रत्नदुर्ग किल्ला, भगवती मंदिराची स्वच्छता

रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत मंगळवारी वारसास्थळाची स्वच्छता हा कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील एनएसएस स्वयंसेवकांनी ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ला आणि भगवती मंदिर या वारसास्थळाच्या आवारात स्वच्छता केली.

देव वरिष्ठ महाविद्यालय आणि रत्नागिरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात महाविद्यालयातील एनएसएस विभागाचे ३० स्वयंसेवक सहभागी झाले. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य मधुरा पाटील, एनएसएस विभागप्रमुख ऋतुजा भोवड व सहकारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 02-10-2024