रत्नागिरी : सध्या संपूर्ण महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याचे काम महाराष्ट्र सरकार करतय. आदनीचे लाड सरकार कडून केले जात आहेत. सरकारने आता स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केली आहे. महावितरण च्या माध्यमातून बसवले जाणारे हे स्मार्ट मीटर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जाळून टाकेल व पालकमंत्री उदय सामंत यांच्या घराबाहेर आंदोलन करेल, असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. ते आज रत्नागिरी दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, कि सध्या महाराष्ट्र हा अदानीच्या घशात घालण्याचं काम महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे. त्यांनी आता स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केलेली आहे जे आम्ही मागच्या पाच वर्षांमध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून रत्नागिरीमध्ये होऊ दिले नव्हते. पायलट बेसवर रत्नागिरी जिल्ह्यातले 100% विद्युत मीटर हे अदानी पुरस्कृत इलेक्ट्रिक मीटर बसवायचे ही घोषणा केली होती. पण आम्ही जागृत लोकप्रतिनिधी होतो त्यामुळे त्यांनी आम्ही होऊ दिला नाही. आज पुन्हा एकदा रत्नागिरीतला अनेक तालुक्यांमध्ये काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरु आहे. आम्ही आपल्या माध्यमातून सर्व रत्नागिरीकर यांना एका विनंती करू इच्छितो हे स्मार्ट मीटर जाळून टाकण्याचा आंदोलन या एका दोन दिवसांमध्ये सुरू करणार आहोत. पण त्याचबरोबर आम्ही पालकमंत्र्यांच्या घराच्या बाहेर सुद्धा बसून निदर्शने देखील करणार आहोत. स्मार्ट मीटर हे आत्ता पहिले दोन महिने व्यवस्थित चालतील पण तिसऱ्या महिन्यापासून येणाऱ्या बिलात तिप्पट वाढ होणार अशा पद्धतीची आमची खात्रीला एक माहिती आहे. म्हणून त्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार असल्याची माहिती माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 01-02-2025













