चिपळूण : एम. एस. कॉलेजतर्फे पथनाट्यातून जनजागृती

चिपळूण : जागतिक हृदयदिनाचे औचित्य साधून लाईफ केअर हॉस्पिटल व ऑन्को लाईफकेअर सेंटर आणि ग्लेनमार्क फार्मासिटिकत लिमिटेड यांच्या सहकाकार्या चिपळुणात एम. एस. कॉलेजतर्फे रॅली काढण्यात आली. या वेळी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.

शहरातील बसस्थानक, चिंचनाका तसेच इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर पथनाट्य सादर करण्यात आले, हृदयाची नियमित काळजी घेतल्यास निरोगी जीवनाची हमी मिळेल, तदुरुस्त आयुष्य मिळते. आरोग्य हाच खरी संपत्ती आहे, असा संदेश विविध ठिकाणी आयोजित केलेल्या पथनाट्यातून देण्यात आला हृदयाची कशा प्रकारे काळजी ध्यावी, हे प्रात्यक्षिकातून दाखवण्यात आले.

या रॅलीला डॉ. समीर दळवी यांनी संबोधित केले. रॅलीला हॉस्पिटलकडून डॉ. शाहिद परदेशी, सदिश यादव, प्रयोगशाळा प्रमुख मुसा पिरजादे, आनंद सावंत, ग्लेमार्क कंपनीचे विनायक भोकरे, विजय अंतुरकर, अमोल शिर्के, एमआर प्रतिनिधी नीतेश खाडे, कॉलेजच्या तेजस्विनी काळे, वृषाली जाडे, जनसंपर्क अधिकारी अभिजित सुर्वे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 02/Oct/2024