चिपळूण तालुका नमन-भारूड लोककला मंडळ अध्यक्षपदी भिकाजी भुवड

चिपळूण : नमन लोककला संस्था रत्नागिरी जिल्हा संलग्न चिपळूण तालुका नमन, भारुड लोककला मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची बैठक सावर्डे भुवडवाडी येथे झाली. यामध्ये नूतन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी पुन्हा भिकाजी भुवड यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. लोककलेसाठी झटणारी नमन लोककला संस्था रत्नागिरी जिल्हा या मातृसंस्थेच्या छत्रछायेखाली चिपळूण तालुका नमन, भारुड लोककला मंडळ संघटना कार्यरत आहे. गेली अनेक वर्ष नमन लोककलावंतांच्या हितासाठी चिपळूण तालुका नमन संघटना कार्यरत आहे.

नुकतीच या संघटनेची ए वन केदारनाथ नमन मंडळ सावर्डे भुवडवाडी येथील सभागृहामध्ये बैठक झाली. यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी भिकाजी भुवड (वीर), सचिव संजय भागडे (आबिटगाव), उपसचिव संदेश वाघे (सावर्डे), सुभाष डिके (मांडकी खुर्द), उपाध्यक्ष शांताराम जावळे (कामथे), अमोल खांबे (मांडकी), खजिनदार तानाजी गुडेकर (मांडकी खुर्द), उपखजिनदार सुरज हुमणे (आगवे) तर सल्लागार म्हणून प्रकाश हुमणे, नामदेव दुर्गोली, सदस्यपदी प्रवीण कोदारे, संतोष बळकटे, प्रशांत लांबे, संतोष भुवड, संजय गोडमडे, प्रदीप घडशी यांची निवड करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन संतोष कुळे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 05/Feb/2025